हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 11:23 IST2019-06-27T11:11:56+5:302019-06-27T11:23:27+5:30
काँग्रेस प्रवक्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
चंदिगड: काँग्रेस प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-9 मध्ये हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5-6 गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Haryana: Congress leader Vikas Chaudhary shot at in Faridabad. More details awaited. pic.twitter.com/m6Zqru6JOy
— ANI (@ANI) June 27, 2019
भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. विकास यांच्यावर दोघांनी हल्ला केल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. विकास त्यांच्या गाडीतून जिमला जात असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींचं फुटेज तपासलं जात आहे.
सकाळी नऊच्या सुमारास विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सेक्टर-9 मध्ये असलेल्या हुडा बाजारातील जिममध्ये जाण्यासाठी चौधरी गाडीतून उतरले. तेव्हाच हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार सुरू केला. त्यांनी 5-6 राऊंड फायर केले. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले.