विनेश फोगाट यांनी शेतकऱ्यांबाबत एक मोठं विधान केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. "आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करत आहेत हे खरोखरच दुःखदायक आहे. एकीकडे त्यांच्या कष्टाने पिकवलेल्या पिकांचा पेंढा जाळल्यानंतर होणारा धूर दिल्लीपर्यंत पोहोचतो, हे अतिशयोक्त पद्धतीने दाखवलं जातं. पण शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, त्यांच्या वेदना, त्यांची मेहनत सॅटेलाईटमधूनही दिसत नाही."
"आपल्या देशाचा अन्नदात्याला प्रत्येक पावलावर उपेक्षित का वाटतं? एकीकडे MSP सुरूच होती, सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे, पंतप्रधान आणि कृषीमंत्र्यांनी खूप दावे केले आहेत. तर दुसरीकडे बाजारपेठेची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला MSP देण्याची ठोस व्यवस्था का केली जात नाही?"
"शेतकरी हा देशाचा कणा"
"शेतकरी हा केवळ आपल्या कृषी व्यवस्थेचाच एक भाग नसून देशाचा कणा आहे. त्यांना योग्य तो आदर आणि पाठिंबा मिळायला हवा" असं देखील विनेश फोगाट यांनी म्हटलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट यांनी जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. भाजपाचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६,०१५ मतांनी पराभव केला.
जुलाना मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी हे लोकांचं प्रेम असल्याचं म्हटलं होतं. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी पुढील पाच वर्षे कायम ठेवेन. एकट्याने लढलेल्या प्रत्येक स्त्रीचा हा लढा आहे असं देखीव विनेश फोगाट यांनी म्हटलं आहे.