haryana election 2019 : हरयाणामध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 09:14 AM2019-10-24T09:14:01+5:302019-10-24T09:15:00+5:30

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक कलांमध्ये हरयाणामध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर मिळत आहे.

haryana election 2019: Close fight between BJP & Congress in Haryana | haryana election 2019 : हरयाणामध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

haryana election 2019 : हरयाणामध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

Next

चंदिगड - हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक कलांमध्ये हरयाणामध्ये काँग्रेसकडूनभाजपाला कडवी टक्कर मिळत आहे. आतापर्यंत ९० पैकी ७७ जागांचा कल हाती आला आहे. या कलांमध्ये भाजपा ३८ जागांवर तर काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्षांकडे ८ जागांवर आघाडी आहे. 

हरयाणा विधानसभेमध्ये एकूण ९० जागा असून, येथे भाजपा, काँग्रेस, जेजेपी आणि इंडियन नॅशनल लोकदल यांच्यात चुरस आहे.  २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपाने संपूर्ण बहुमत मिळवले होते. 

यावेळी हरयाणामध्ये विस्कळीत विरोधी पक्षाचा लाभ घेऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे. 
 

Web Title: haryana election 2019: Close fight between BJP & Congress in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.