शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:08 PM

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

Haryana Election 2024 : आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर, हरयाणात भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे. या हॅट्रीकसह नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यामुळे, आजचा हा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल, पण असे नाही. भाजपचे राजकारण आणि रणनीती बारकाईने जाणून घेतल्यास हरयाणाचा निकाल तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने हरयाणा विधानसभा निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा मुद्दा बराच उचलून धरला होता. विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने भाजपवर चौफेर टीका केली होती. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आपल्या माडण्यांसाठी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणाच्या सीमा खुल्या केल्या जातील, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. विशेषत: जाट समाजाला भाजपपासून दूर करण्यासाठी बरीच रणनीती आखण्यात आली.

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

एकंदरीत, हरयाणातील शेतकरी भाजपवर नाराज आहेत, ते भाजपला आता धडा शिकवतील, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने निकाल येत आहेत, त्यावरुन असे दिसते की, शेतकरी भाजपवर नाराज नसून, खुश आहेत. आता प्रश्न पडतो की, मतदानापूर्वी भाजपच्या विरोधात फिरणारे वारे अचानक भाजपच्या दिशेने कसेकाय फिरू लागले? भाजपने नेमकी कोणती रणनीती अवलंबली, ज्यामुळे पक्षाचा एकहाती विजय झाला.

शेतकरी खरच नाराज होते का?हरयाणा निवडणुकीतील दुसरा सर्वात मोठा मुद्दा 'जवानांचा' होता. काँग्रेसने अग्निवीर योजनेचा संबंथ हरयाणाशी जोडला. याचे कारण म्हणजे, लष्करातील सुमारे 10 टक्के सैनिक हरयाणातील आहेत. हरयाणाची लोकसंख्या 3 कोटींच्या आसपास आहे. एवढेच नाही तर शेतकरी आणि सैनिकांचा प्रश्न हरयाणातील प्रत्येक घराशी संबंधित आहे. केंद्र सरकारची 'अग्नवीर योजना' ही सैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने देशभरात हेच मुद्दे मांडले होते. हरयाणात भाजप-काँग्रेसने लोकसभेच्या 5-5 जागा जिंकल्या होत्या.  तर, हरियाणाच्या 'जाट'बहुल भागात भाजपला ज्या प्रकारे यश मिळतंय, ते पाहता शेतकरी आणि सैनिकांचा मुद्दाच कुठे आहे? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या निकालावरुन हेही स्पष्ट होईल की, 'अग्नीवीर योजने'बाबत विरोधक जो नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा स्थानिक पातळीवर काहीही परिणाम झालेला नाही. 

भाजपची रणनीती कामी आलीदुसरीकडे, भाजपच्या विजयाचे श्रेय त्यांच्या रणनीतीलाही जाते. हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करुन किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीरबाबत भाजपने हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराजी कशाला, असा संदेश जनतेत गेला. यामुळेच भाजपला जनतेचा पाठिंबा मिळाला. आता भाजप त्याचे भांडवल देशातील इतर राज्यांमध्येही करेल, असे म्हणता येईल. यासोबतच अग्निवीर योजनेची मान्यताही वाढली असून, ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या मागण्यांचाही विचार करावा लागणार आहे.

हरियाणात हॅटट्रिक...भाजपसाठी बूस्टर डोसलोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा निवडणूक ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणीत भाजपला जोरदार यश मिळाले असून, आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे हरियाणा निवडणुकीचा स्पष्ट संदेश जाईल की, शेतकरी आणि सैनिक भाजपसोबत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, भाजपसाठी मोठा दिलासा आहे.

 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी