Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होईल, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल. दरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा (Bhupinder Hooda) यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
हुड्डा यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांना विनेश फोगाटच्या उमेदवारीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "कुठलाही खेळाडू हा पक्षाचा नसून देशाचा असतो. सचिन तेंडुलकर यां ज्याप्रमाणे राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती, त्याचप्रमाणे विनेश फोगटलाही उमेदवारी देण्यात यावी. आम्हाला विनेशला राज्यसभेवर पाहायचे आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संबंधित बातमी- 'गोल्डन कामगिरी'! विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला; एक डील अन् कोट्यवधींचा वर्षाव, वाचा सविस्तर
हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया यांनी विनेश फोगटशी संपर्क साधला आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, "राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महिला, तरुण आणि वृद्धांना संधी देणार आहे. आम्ही प्रत्येक वेळी महिलांना तिकीट देतो. आमच्या नेत्यांनी विनेशशी संपर्क साधला की नाही, ते मला माहीत नाही. पण जर विनेशला निवडणूक लढवायची असेल, तर. आम्ही नक्कीच तिचे स्वागत करू," असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.