भाजपाचा बहुमताचा प्रश्नच मिटला; अपक्ष येणार मदतीला धावून?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:14 PM2019-10-24T22:14:29+5:302019-10-24T22:16:09+5:30
अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू
चंदिगढ: महाराष्ट्रात शिवसेनेच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला हरयाणात जोरदार झटका बसला आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, असा अंदाज पक्षाच्या नेत्यांना होता. मात्र भाजपा बहुमतापासून 6 जागा दूर आहे. त्यामुळे आता भाजपानं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याच्या तयारी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं भाजपाच्या वतीनं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्यपाल सत्यनारायण यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दिवाळीच्या आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हरयाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यापैकी 39 जागांवर भाजपानं विजय मिळवला असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. सध्याची आकडेवारी पाहता भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. राज्यात काँग्रेसला 31 जागांवर यश मिळालं आहे.
Gobind Kanda, brother of Independent MLA Gopal Kanda:
— ANI (@ANI) October 24, 2019
2009 has repeated itself in 2019. Instead of Congress it is BJP today, with victory on 40 seats. Gopal Kanda has left for Delhi with 6 MLAs. They will form BJP's govt. #HaryanaAssemblyPollspic.twitter.com/RGqlEkpzuV
भाजपानं सध्या अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. हरयाणात 7 अपक्ष आमदार विजयी झाले आहेत. यातील 5 जण आधी भाजपात होते. मात्र पक्षानं तिकीट नाकारल्यानं त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे या पाच आमदारांची समजूत काढणं भाजपासाठी सोपं ठरू शकतं. भाजपानं त्या दृष्टीनं पावलं टाकण्यासदेखील सुरुवात केली आहे. त्यामुळे पडद्यामागे वेगानं घडामोडी सुरू असल्याचं समजतं आहे.