"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:25 PM2024-10-09T14:25:00+5:302024-10-09T14:28:29+5:30

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला.

haryana election result BJP's poll victory in Haryana, party leader Dalip Singh Rana aka The Great Khali big statement  | "काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

haryana election result | अंबाला : हरयाणात भाजपने मिळवलेल्या विजयानंतर पक्षाचा नेता दलीप सिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीने हरयाणातील जनतेचे आभार मानताना आनंद व्यक्त केला. काँग्रेस सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचेल अशी चर्चा असताना भाजपने विजयाची हॅटट्रिक लगावली. भाजप हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपने स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवले आहे.

भाजपच्या विजयानंतर द ग्रेट खलीने म्हटले की, भाजपचा विजय झाला याचा खूप आनंद वाटतो. संपूर्ण हरयाणातील जनता विजयाचा आनंद साजरा करत आहे. अनिल वीज यांनी सातव्यांदा विजय मिळवून विक्रम केला आहे. अनेकांना एकदा निवडून येणे देखील कठीण असते. पण, ते सातव्यांदा आमदार बनले ही एक मोठी बाब आहे. याचा मला खूप आनंद झाला. माध्यमांनी दाखवले की, काँग्रेस जिंकणार हे पाहून आम्ही नाराज झालो होतो. परंतु, हरयाणातील जनेतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना निवडून दिले आहे. दरम्यान, २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. फक्त दोन मंत्र्यांचा विजय झाला आहे.

आठ मंत्र्यांचा पराभव 
- ज्ञानचंद गुप्ता (विधानसभा अध्यक्ष)- पंचकुला
- सुभाष सुधा- थाणेसर
- संजय सिंह- नूंह
- असीम गोयल- अंबाला शहर
- कमल गुप्ता- हिसार
- कंवर पाल- जगाधरी
- जेपी दलाल- लोहारू
- अभे सिंग यादव- नांगल चौधरी
- रणजितसिंह चौटाला – रानियां (अपक्ष)

Web Title: haryana election result BJP's poll victory in Haryana, party leader Dalip Singh Rana aka The Great Khali big statement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.