चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:44 PM2024-10-08T20:44:42+5:302024-10-08T20:45:20+5:30

Haryana Election Results: चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

Haryana Election Results: Chandrasekhar's party suffered a big blow in Haryana; Many candidates got less than 500 votes | चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...

Haryana Election Results 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षानेही नशीब आजमावले. पक्षाने 20 जागांवर निवडणूक लढवली. दुष्यंत चौटला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षासोबत युती करणाऱ्या आझाद समाज पक्षाला चांगल्या परिणामाची आपेक्षा होती, पण तसे झाले नाही. 

या निवडणुकीत चंद्रशेखर यांच्या पक्षाची अतिशय वाईट अस्था झाली. काही जागांवर तर ASP उमेदवाराला 500 पेक्षाही कमी मते मिळाली. अंबाला शहरात आझाद समाज पक्षाच्या पारुल नागपाल उदयपुरिया यांना 2423 मते मिळाली. या जागेवर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जगाधरीमधील उमेदवाराला केवळ 2684 मते मिळाली. या जागेवर ते पाचव्या क्रमांकावर राहिले. तर, निलोखेरीमध्ये पक्षाचे उमेदवार करम सिंह यांना केवळ 387 मते मिळाली.

कोणाला किती जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी किती होती?
सोनीपतमध्ये राजेश यांना फक्त 227 मते मिळाली. या जागेवर ते सातव्या क्रमांकावर राहिले. महेंद्रगडमध्ये एएसपीचे शशी कुमार यांना 464 मते मिळाली, ते 9व्या क्रमांकावर राहिले. रेवाडीमध्ये मोकी देवी यांना 206 मते मिळाली, या जागेवर त्या 8व्या स्थानावर होत्या. सोहना जागेवर आझाद समाज पक्षाच्या विनेश गुजर घटाला 2040 मते मिळाली. पुनहाना येथील अताउल्ला 829 मतांसह पाचव्या क्रमांकावर होते. तर, प्रिथला जागेवर गिरिराज जटोला यांना 270 मते मिळाली.

हरयाणाचे निकाल
हरियाणात भाजप 48, काँग्रेस 37, आयएनएलडी 2 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या. तर, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला एकही जागा जिंकता आली नाही. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर भाजपला 39.93 टक्के,  काँग्रेसला 39.10 टक्के, बसपाला 1.82 टक्के आणि जेजेपीला 0.90 टक्के मते मिळाली आहेत.

Web Title: Haryana Election Results: Chandrasekhar's party suffered a big blow in Haryana; Many candidates got less than 500 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.