Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:35 PM2019-10-21T22:35:55+5:302019-10-21T22:37:22+5:30

हरयाणात भाजपा सत्ता राखणार; जागाही वाढणार

Haryana exit poll 2019 BJP likely to return to power with bigger mandate | Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

Next

मुंबई: महाराष्ट्रासोबतच आज हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीचं मतदानदेखील पार पाडलं. या राज्यातही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची आकडेवारी विविध एक्झिट पोलमधून समोर आली आहे. महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरणार असला तरी तो एकहाती सत्ता मिळवेल, अशी शक्यता कमी दिसते. मात्र हरयाणात भाजपा स्वबळावर सत्ता राखणार आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काठावरचं बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची कामगिरी यंदा मोठ्या प्रमाणात सुधारेल, असे आकडे सांगतात. 

हरयाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 46 जागांचा जादुई आकडा गाठा लावतो. गेल्या निवडणुकीत भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आज मतदान संपल्यानंतर समोर आलेले विविध एक्झिट पोल पाहता भाजपाची सत्ता कायम राहील, असा अंदाज आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास भाजपाला 66 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या जागा 13 वर येऊ शकतात. या निवडणुकीत इतरांना 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

2009 मध्ये हरयाणात भाजपाला अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 2014 मध्ये भाजपाच्या जागा थेट 47 वर गेल्या. याच कालावधीत काँग्रेसची कामगिकी मात्र घसरत गेली. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 35 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे त्याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसला 67 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये काँग्रेसला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर काँग्रेसची राज्यातील कामगिरी आणखी खालावली. 

विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलची आकडेवारी
टाईम्स नाऊ
भाजपा- 71
काँग्रेस- 11
इतर- 8

जन की बात
भाजपा- 57
काँग्रेस- 17
इतर-16

न्यूज एक्स
भाजपा- 77
काँग्रेस- 11
इतर- 2

टीव्ही9 भारतवर्ष
भाजपा- 47
काँग्रेस- 23
इतर- 20

न्यूज18- आयपीएसओएस
भाजपा- 75
काँग्रेस- 10
इतर- 5

सी व्होटर
भाजपा- 72
काँग्रेस- 8
इतर- 10

 

Web Title: Haryana exit poll 2019 BJP likely to return to power with bigger mandate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.