हरियाणाच्या भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनिल विज यांनी मोठं विधान केलं आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर त्यांच्याशी कोणीही बोललं नाही, असं ते म्हणाले. मला कोणीही समजवण्याचा प्रयत्नही केला नाही असं सांगितलं आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवशी अनिल विज म्हणाले होते की, ते भाजपाचे भक्त आहेत आणि परिस्थिती बदलत राहते.
भाजपासाठी यापुढे देखील काम करणार असल्याचं अनिल विज यांनी सांगितलं होतं. तुम्हाला कोणी समजवायला आलं होतं का? असा प्रश्न विज यांना विचारला असता ते म्हणाले की, नाही, मला अजिबात राग आलेला नाही. शपथविधी झाल्यापासून कोणीही त्यांच्याशी बोललेलं नाही. विधानसभेच्या अधिवेशनालाही हजेरी लावली आहे. सर्वजण उपस्थित होते पण माझ्यासोबत कोणीही काहीही बोललेलं नाही.
अनिल विज म्हणाले की, ते जे काही करत आहेत ते चांगलंच करत आहेत. चांगलं सरकार चालवणार. नायब सिंह सैनी हे आमचे छोटे भाऊ आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते उत्तम काम करतील. अनिल विज यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.