चंदीगड - या महिन्यात मोहरीच्या तेलाचा तुटवडा लक्षात घेत, हरियाणा सरकारने या तेलाची सब्सिडी थेट बीपीएल आणि अंत्योदय अन्न योजनेतील (AAY) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे, की हाफेड (HAFED) जून, 2021 दरम्यान मोहरीचे तेल उपलब्ध करून देण्यात सक्षम नाही. यामुळे रेशन दुकानांवरून सामग्री घेणाऱ्या लाभार्थ्यांना तेलाचे वितरण करता येणार नाही. (Haryana government to transfer mustard oil subsidy directly into bank accounts)
बाजारातील मोहरीच्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकरी आपली मोहरी थेट बाजारात 6500-7000 रुपये क्विंटल दराने विकत आहेत. मोहरी उपलब्ध होत नसल्याने हाफेडकडे मोहरीचे तेल उपलब्ध नाही. यामुळे राज्य सरकारकडून जून 2021 पासून 2 लीटर मोहरीच्या तेलासाठी 250 रुपये सब्सिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार येईल. असा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
खाद्यतेलावरील आयात कर निर्णय पुढे ढकला; उद्योग क्षेत्राची मागणी
सब्सिडीचे पैसे एएवाय आणि बीपीएल कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 11,40,748 एएवाय आणि बीपीएल कुटुंबांना याचा फायदा होईल. तसेच, हाफेडकला मुबलक प्रमाणात मोहरी उपलब्ध होईपर्यंत ही सुविधा सुरू राहील, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
याशिवाय लॉकडाउनमुळे पुरवठादार 1 किलो ग्रॅमच्या पाकिटात मिठ उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहेत. यामुळे जून 2021 पासून मिठाचेही वितरण केले जाणार नाही. तसेच यासाठी सबसिडीही दिली जाणार नाही. यामुळे जेव्हा 1 किलो ग्रॅम पॅकिंगमध्ये मिठ उपलब्ध होईल, तेव्हा त्याचे वितरण पुन्हा सुरू केले जाईल, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.