ऑनलाइन लोकमत -
चंदिगड, दि. 23 - जाट आरक्षण आंदोलनप्रकरणी हरियाणा सरकार 29 फेब्रुवारीला सद्यस्थिती अहवाल सादर करणार आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला जाट आंदोलनादरम्यान झालेला हिसंचार तसंच रेल्वे, रस्तेमार्ग रोखण्यामुळे झालेलं नुकसान याप्रकरणी सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास सांगितला होता.
उच्च न्यायालयाने राज्यातील स्थिती सामान्य होण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे असं निरीक्षण नोंदवल होतं. उच्च न्यायालयाने लोकांना आणि राजकारण्यांना राज्यातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
यादरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रोहतकमध्ये काही स्थानिकांची भेट घेतली असता त्यांचा विरोध करण्यात आला. कॅनल विश्रामगृहाबाहेर लोकांनी काळे झेंडे दाखवत मुर्दाबादच्या घोषणादेखील देण्यात आल्या.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या घटनांमागे कोण आहे याचा तपास केला जाईल असं आश्वासन लोकांना दिलं आहे. आंदोलनादरम्यान ज्या निर्दोष लोकांनी आपला जीव गमावला आहे त्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली केली आहे. परिस्थिती हाताळण्यात जर कोणी चुकवेगिरी केली असेल तर त्या पोलीस आणि जिल्हाधिका-यांवर कारवाई करण्यात येईल. लोकांकडून येणा-या तक्रारी पडताळून पाहण्यासाठी समिती गठीत करत असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.
WATCH: People affected by #Jatreservation protests raise 'murdabad' slogans against Haryana Government in Rohtakhttps://t.co/M0iEOvfDSq— ANI (@ANI_news) February 23, 2016