शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

भाजप सरकारचं समर्थन काढलं, अपक्ष आमदाराच्या घरावर पडले आयकर विभागाचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 6:25 PM

पत्नीच्या माहेरी हिसारमधील हांसी येथे आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय कुंडू यांच्या व्यवसायांच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरीदेखील छापेमारी करण्यात आली. (income tax department raid)

ठळक मुद्देहरियाणातील महम येथील अपक्ष आमदार बलराज कुंडू यांच्या तसेच त्यांच्या नातलगांच्या घरावर आयकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. कुंडू यांनी 2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपच्या मनोहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा दिला होता.कुंडू यांना भाजपने तिकीट नाकारले होते.

चंदीगड - हरियाणातील (Haryana) महम येथील अपक्ष आमदार बलराज कुंडू (Balraj Kundu) यांच्या तसेच त्यांच्या नातलगांच्या घरावर आयकर विभागाने (income tax department) गुरुवारी छापे टाकले. विशेष म्हणजे कुंडू यांच्याशी संबंधित तब्बल 30 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. कुंडू यांनी 2019च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपच्या मनोहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या वर्षी त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होते. (Haryana income tax department raid on independent mla balraj kundu)

पत्नीच्या माहेरीही छापेमारी -एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाच्या चमूने आज गुरुवारी सकाळी बलराज कुंडू यांच्या रोहतक सेक्टरमधील घरावर आणि गुरुग्राममधील घरावर छापा टाकला. एवढेच नाही, तर त्यांच्या पत्नीच्या माहेरी हिसारमधील हांसी येथे आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय कुंडू यांच्या व्यवसायांच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरीदेखील छापेमारी करण्यात आली.

हरियाणा विधानसभेसाठी भाजपने नाकारले होते तिकीट -बलराज कुंडू यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपने तिकीट नाकारले होते. या निवडणुकीत कुंडू यांनी भाजप उमेदवार समशेर सिंह यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद सिंह दांगी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी मनोहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा दिला होते.

म्हणून काढला होता खट्टर सरकारचा पाठिंबा -केंद्र सरकारने आणलेल्या तीनही कृषी कायद्यांना विरोध दर्शवत बलराज कुंडू हे शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहिले होते. एवढेच नाही, तर ते शेतकरी महापंचायतींच्या व्यासपीठावरही दिसून आले. त्यांनी गेल्या वर्षी सहकार मंत्री मनीष ग्रोवर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, खट्टर सरकारने कुठलीही कारवाई न केल्याने त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. 

टॅग्स :HaryanaहरयाणाGovernmentसरकारITमाहिती तंत्रज्ञानraidधाड