Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:11 AM2024-10-08T11:11:50+5:302024-10-08T11:13:07+5:30

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत.

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 updates Election Results 2024 Big change in Haryana, BJP's storm in the result Will Gulal burst with a hat-trick | Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?

Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यानंतर एक्झिटपोल आले. या एक्झिटपोलमध्ये दोन्ही राज्यांत काँग्रेसला संधी तर भाजपची धूळ-धाण उडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज या दोन्ही राज्यांचे निकाल येत असून, विविध संस्थांनी हरिणाच्या बाबतीत दिलेला एक्झिट पोल पूर्णपणे फेल जाताना दिसत आहे. हरिणायात भाजपचे जोरदार वादळ बघायला मिळत आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचे दिसत आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप पिछाडीवर आहे. 

हरियाणामध्ये मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप पिछाडीवर तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मात्र, आता मोठा उलफेर झाला असून भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आघाडी आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत.

हरियाणातील निवडणूक निकालात भाजपचे वादळ बघायला मिळत आहे. येथे विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. तर बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून 49 जागांवर आघाडीवर आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. तर काँग्रेस 35 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे. 

भाजप हॅटट्रिकसह गुलाल उधळणार - 
हरयाणामध्ये गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. तर आतापर्यंतचे आकडे बघा भाजप हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक करताना दिसत आहे. अर्थात येथे भाजप विजयी झाल्यास हॅट्रिकसह गुलाल उधळेल.

अशी आहे जम्मू काश्मीरची स्थिती - 
तर जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. येथील निकालात भाजप 28 जागांवर, जेकेएनसी 38 जागांवर, काँग्रेस 8 जागांवर तर इतर 8 जागांवर आघाडीवर आहेत. जम्मू-काश्मीरात शेवटची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झाली होती. तेव्हा भाजपने पीडीपीसोबत युती करून सरकार स्थापन केले होते. नंतर भाजप सरकारमधून बाहेर पडला होता. दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले. यानंतर तेथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामुळे येथील  निवडणूक अनेक अर्थांनी विशेष होती. येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवली, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात होता.

Web Title: Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 updates Election Results 2024 Big change in Haryana, BJP's storm in the result Will Gulal burst with a hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.