नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट करनाल पोलिसांनी उधळून लावला आहे. हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातून 3-4 संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चार संशयितांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे चौघेजण नांदेडला जात होते. दरम्यान, दिल्लीत मोठा कट घडवून आणणार होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
RDX असण्याची शक्यताकरनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक बंदूक, मोठ्या प्रमाणात गोळ्या, 3 आयईडी आणि गनपावडरचे कंटेनर जप्त केले आहे. ही गनपावडर RDX साठी वापरली जाणार होती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळा सापडला आहे की, यातून अनेक शहरात मोठे बॉम्बस्फोट घडवले जाऊ शकले असते.
दहशतवादी नांदेडला जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी आयबी, पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. हे लोक पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते.
मोस्ट वॉन्टेड रिंदाशी संबंधहे चौघे खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा याच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंदा हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात लपला आहे. कर्नाल येथील बस्तारा टोलनाक्यावरुन एक इनोव्हा वाहनातून हे चौघे जात होते. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असल्याची माहिती कर्नालचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी दिली आहे. रिंदा याने ही शस्त्रे पाकिस्तानातून फिरोजपूरमध्ये ड्रोनद्वारे पाठवली होती.