शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 4:09 PM

Haryana Violence: पोलिसांची हत्या करण्याच्या उद्देशाने दगडफेक आणि गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

Haryana Violence: हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 41 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून, 120 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. नूह हिंसाचाराशी संबंधित एफआयआरमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, ज्यात पोलिसांवर हत्या करण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची माहिती आहे. 

एफआयआरमध्ये काय खुलासे झाले?पोलीस निरीक्षक पंकज कुमार यांनी सोमवारी नूह येथे झालेल्या गोंधळानंतर एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी अदबर चौकातील हिंसाचाराचा उल्लेख केला. एफआयआरमध्ये असे लिहिले की, 600-700 लोकांचा जमाव धार्मिक घोषणा देत पोलिसांच्या दिशेने आले आणि दगडफेक केली. जमावातील काही लोकांनी गोळीबारही सुरू केला, ज्यामध्ये एक गोळी पोलीस निरीक्षक अनिल कुमार यांच्या पोटात लागली. यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. 

अनेक ठिकाणी तोडफोडएफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, 31 जुलै रोजी सायबर क्राईमच्या पोलिस स्टेशनवर जमावाने हल्ला केला, त्यादरम्यान पोलिस स्टेशनची भिंत आणि गेट तोडले. जमावाने अनेक खासगी आणि सरकारी वाहनेही जाळली. हिंसाचाराच्या वेळी हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. एवढंच नाही, तर दुकानांतून कुलर-इन्व्हर्टर, लॅपटॉपसह इतर अनेक वस्तू घेऊन पळ काढला.

मृतांचा आकडा 6 वर पोहोचला नूहमधील हिंसाचारातील मृतांची संख्या आतापर्यंत 6 वर पोहोचली आहे. डीजीपी पीके अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, हिंसाचाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल. दरम्यान, नूहपासून सुरू झालेला हिंसाचार गुरुग्रामपर्यंत पसरला आणि सोमवारी रात्री प्रचंड गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री देखील गुरुग्रामच्या सेक्टर 70 मध्ये जाळपोळ झाली. 

 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारstone peltingदगडफेकPoliceपोलिस