शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
2
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
3
संपादकीय: अभिजात मराठी!
4
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
5
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
6
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
7
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
9
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
10
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
11
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
12
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
13
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
15
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
16
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
17
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
18
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
19
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
20
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 7:32 AM

हरयाणात शनिवारी ९० जागांवरील १,०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे.

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली / चंडीगड : भाजपने हरयाणाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त  केल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी राज्यातील जनता लवकरच भाजपच्या उद्योजक धार्जिण्या धोरणांचा ‘चक्रव्यूह’ तोडण्यासाठी त्यांना जोरदार धक्का देईल, अशी टीका केली. दरम्यान, हरयाणा विधानसभेसाठी शनिवारी मतदान होत असून, भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर काँग्रेस सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज आहे.

भाजपने पसरवलेल्या बेरोजगारीच्या आजाराने राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आणले आहे. काँग्रेस सरकार रोजगार निर्माण करील आणि प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल याची काळजी घेईल, असे राहुल यांनी ‘एक्स’वर त्यांच्या नुकत्याच झालेल्या विजय संकल्प यात्रेदरम्यान महिलांच्या गटाशी केलेल्या संवादाचा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

माजी खासदार अशोक तंवर काँग्रेसमध्ये दाखलमाजी खासदार अशोक तंवर यांनी शुक्रवारी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये समावेश केला. यावेळी त्यांनी हरयाणातील सर्व घटकांना, विशेषत: दलित आणि मागासवर्गीयांना विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा जनादेश द्यावा, असे आवाहन केले. तंवर यांनी गुरुवारी हरयाणातील महेंद्रगड जिल्ह्यात राहुल गांधींच्या सभेत अनौपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

१०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणारहरयाणात शनिवारी ९० जागांवरील १,०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी २९ हजार ४६२ पोलिस, २१ हजार १९६ होमगार्ड, १० हजार ४०३ एसपीओ तैनात आहेत.भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. यावेळी निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पहिलवानांचे प्रश्न हेच प्रमुख मुद्दे राहिले आहेत. भाजप आणि काँग्रेसने निवडणूक प्रचारात एकमेकांवर जोरदार टीका केली.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४