एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हेट स्पीच प्रकरणातील निकाल आता समोर आला आहे. एमपी एमएलए विशेष न्यायालयानं अकबरुद्दीन ओवेसी यांना निर्मल आणि निझामाबाद जिल्ह्यासंबंधित दोन प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी विशेष न्यायालयात मंगळवारी यावर सुनावणी पार पडली होती.
सरकारी वकील पुरेसे पुरावे देऊ शकले नाहीत, असं न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं. याशिवाय अकबरुद्दीन ओवेसी यांनी कोणतेही वादग्रस्त विधान करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. देशाची अखंडता लक्षात घेऊन आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. हे प्रकरण २०१२ मधील आहे.
मंगळवारी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. परंतु न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, बुधवारी ओवेसी यांची न्यायालयानं निर्दोश मुक्तता केली. या प्रकरणी सीआयडीनं २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. यात जवळपास ७४ साक्षीदारही हजर झाले होते. नाझिमाबाद प्रकरणी ४१ तर निर्मल प्रकरणाक ३३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. अकबरुद्दीन ओवेसी हे AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू आहेत.