शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

घृणास्पद : एकीचे ‘आॅनर किलिंग’, दुसरीवर एकतर्फी प्रेमातून सूड

By admin | Published: March 07, 2016 3:56 AM

पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र

राजस्थान, आंध्रात दोघींना जिवंत जाळलेजयपूर/ विजयवाडा : पळून जाऊन परजातीत विवाह केला म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेला तिच्या भावांनी राजस्थानात तर एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला तिच्याच गावातील तरुणाने आंध्र प्रदेशात जिवंत जाळल्याच्या घटना घडल्या आहेत.राजस्थानातील घटना शुक्रवारी डुंगरपूर जिल्ह्याच्या पतलासा गावात घडली. त्या गावच्या रजपूत समाजातील रामेश्वरी देवी उर्फ रामो या तरुणीने आठ वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रकाश सेवक या ब्राह्मण मुलाशी विवाह केला होता. लग्नानंतर दोघेही वेगळे राहात होते. लग्नानंतर आठ वर्षांनी ती शुक्रवारी पहिल्यांदाच आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन सासरी आली तेव्हा तिच्या सख्ख्या व चुलत भावांनी तिला जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण सिंग व अन्य सहा जणांना शनिवारी अटक केली.रामेश्वरीला तिचा भाऊ लक्ष्मण सिंग आणि परवीन सिंग तसेच चुलत भाऊ कल्याणसिंग, ईश्वर सिंग, महेंद्र सिंग, भूपाल सिंग आणि गजेंद्र सिंग यांनी मिळून जिवंत जाळले, अशी तक्रार रामेश्वरीची सासू कलावती हिने पोलिसात दाखल केली आहे. ४ मार्च रोजी कलावती, तिचा धाकटा मुलगा, सून आणि रामेश्वरी हे सर्व जण अंगणात बसले असताना लक्ष्मणसिंग हा अन्य ३० जणांसह तेथे आला. त्याने रामेश्वरीला मारहाण केली आणि ओढत बाजूच्या मंदिराजवळ नेले आणि तेथे तिच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले.आंध्र प्रदेशातील घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चतापरु गावात घडली. पैदला इंदुमती या १७ वर्षांच्या मुलीचा गावातील डी. चिन्ना बाबू हा तरुण गेले अनेक दिवस पिच्छा पुरवत होता. यावरून इंदुमतीच्या घरच्या लोकांनी चिन्ना बाबूला काही दिवसांपूर्वी चोपही दिला होता. याचा सूड घेण्यासाठी शनिवारी इंदुमती एकटी असताना चिन्ना बाबू व त्याचा भाऊ पेड्डा बाबू घरात घुसले व त्यांनी रॉकेल ओतून तिला जाळले. ९० टक्के भाजलेल्या इंदुमतीला इस्पितळात हलविण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत तिने चिन्ना व पेड्डा बाबू यांची नावे सांगितल्याने त्यांना अटक केली गेली.