नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हाथरस प्रकरणी सुरू असलेला खटला राज्याबाहेर चालवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याची सुनावणी राज्याबाहेर चालवण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. अलाहाबाद उच्च न्यायालय या प्रकरणाची देखरेख करेल, असंदेखील न्यायालयानं सांगितलं.सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. त्यामुळे हा खटला तातडीनं वर्ग करण्याची गरज नाही. इतर सर्व गोष्टींकडे उच्च न्यायालयाचं लक्ष असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सुनावणीदरम्यान न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारचं प्रतिज्ञापत्र स्वीकारलं. सरकार पीडित कुटुंबाला आणि खटल्याशी संबंधित साक्षीदारांना सुरक्षा पुरवत असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
Hathras Case: उत्तर प्रदेशच्या बाहेर खटला चालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
By कुणाल गवाणकर | Published: October 27, 2020 2:33 PM