नवी दिल्ली : दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात बजावलेल्या भूमिकेमुळे हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांना त्वरित निलंबित करावे व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना प्रियांका व राहुल गांधी शनिवारी भेटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांनी ही मागणी केली. त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे दलित मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याला सांगितले आहे. या जिल्हाधिकाऱ्यांना कोण वाचवू पाहत आहे, असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला.आयपीएस झाले आयएएस अधिकाºयांवर नाराजदलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी दाखविलेल्या दिरंगाईमुळे हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांना निलंबित करण्यात आले; पण जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे उत्तर प्रदेशातील आयपीएस अधिकारी राज्यातील आयएएस अधिकाºयांवर प्रचंड नाराज आहेत.जर एकच चूक दोघांकडून घडली असेल तर शिक्षा फक्त एकाच व्यक्तीला का, असा सवाल राज्यातील आयपीएस अधिकाºयांनी विशेषत: त्यातील तरुण अधिकारी खासगीत करताना दिसत आहेत.आरोपींच्या समर्थनार्थ सवर्णांच्या घोषणादलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या समर्थनार्थ हाथरसमधील या मुलीच्या गावामध्ये रविवारी आयोजिलेल्या सवर्णांच्या सभेत जोरदार घोषणा देण्यात आल्या. अटक केलेल्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी उपस्थितांनी केली.दलित मुलीच्या घराजवळच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे माजी आमदार राजवीर पहेलवान यांच्या घरी आयोजिलेल्या या बैठकीत गावातील सवर्ण हे आरोपींच्या बाजूने उभे असल्याचे चित्र दिसले.या बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी गावातील लोक उत्स्फूर्तपणे जमले होते. आम्ही बैठक बोलाविली नव्हती, असा दावा राजवीर यांनी केला.
Hathras Gangrape: हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांना निलंबित करा; प्रियांका गांधी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 1:18 AM