शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Hathras Gangrape : हाथरस प्रकरणाला नवं वळण? पीडितेचा भाऊ आणि आरोपीमध्ये फोनवर १०४ वेळा झालं होतं संभाषण

By बाळकृष्ण परब | Published: October 06, 2020 8:43 PM

Hathras Gangrape News: या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देआरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे आले समोर पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा झाले संभाषण पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणाती मुख्य आरोपी संदीप हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या होते संपर्कात

लखनौ - हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिच्या झालेल्या मृत्यूमुळे सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणाती मुख्य आरोपी संदीप हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तसेच यापैकी बहुतांश कॉल हे चंदपा येथून करण्यात आले असे दिसून आले. या परिसर पीडितेच्या गावापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे.

Hathras Gangrape : पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला, 'या' तीन मुद्द्यांवर युपी सरकारला द्यावं लागणार प्रतिज्ञापत्र

समोर आलेल्या कॉल डिटेल्सनुसार ६२ कॉल हे पीडित कुटुंबाकडून करण्यात आले. तर ४२ कॉल हे आरोपी संदीपकडून करण्यात आले. पीडितेचं कुटुंब आणि आरोपींमध्ये नियमितपणे संभाषण होत असल्याचे यूपी पोलिसांच्या तपासात दिसून आले. आरोपी संदीपला पीडितेच्या भावाने कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.यादरम्यान, या प्रकरणी एसआयटीचा तपाससुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे. आता एसआयटी आपला तपास अहवाल बुधवारी योगी आदित्यनाथ यांना सुपूर्द करतील अशी शक्यता आहे. गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली डीआयजी चंद्रप्रकाश आणि एसपी पूनम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.या प्रकरणी एसआयटीने गेल्या आठवड्यात चर्चा सुरू केली होती. तसेच या एसआयटीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. एसआयटीचे पथक पीडितेचे कुटंबीय राहत असलेल्या चंदपामधील त्या गावातही पोहोचले होते. तसेच एसआयटीने पीडितेच्या कुटुंबीयांचाही जबाब नोंदवला होता.काय आहे नेमकं प्रकरणहाथरसमधील एका तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच पीडित युवतीची आरोपींनी जीभही कापल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेच्या मणक्याचे हाडही मोडले होते. क्रूरपणे बलात्कार झालेल्या तरुणीला उपचारांसाठी प्रथम अलीगडमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिथे उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उत्तर प्रदेशचे सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. पीडित तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आऱोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी