ठळक मुद्देहाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहीलआम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी
हाथरस (उत्तर प्रदेश) - हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असा हुंकार राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर केले.पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की, हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहील. आम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार. न्याय झाला नाही तर ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तर आपल्याला न्याय हवाय अशी मागणी पीडित कुटुंबाने आमच्याकडे केली आहे. तसेच या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले होते. यानंतर दोघेही हाथरससाठी रवाना झाले असून प्रियंका गांधी स्वत: गाडी चालवत आहे. तर राहुल गांधी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसून आले होते.ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला.