भोले बाबा यांच्या हाथरसच्या फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबांबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना भोले बाबा हे दारूचे खूप शौकीन असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. आधी ते खूप दारू प्यायचे. गावकऱ्यांनी त्यांना अनेकदा दारू पिताना पाहिलं होतं. तसेच रंगेहाथ पकडलं होतं.
भोले बाबा यांचे सासरचे घर एटाहून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोटिया खुर्द गावात आहे. या गावातील लोकांनी इंडिया टीव्हीशी खास संवाद साधला. गावातील लोकांनी मोठा दावा केला आहे की, भोले बाबा हे ग्रामस्थ आणि ऑटो चालकांसोबत मद्यपान करत असे.
गावातील ज्येष्ठ व्यक्ती दुर्गविजय सिंह यांनी दावा केला की, सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबा यांच्याकडे कोणतीही शक्ती नाही. ते ढोंगी आहेत. त्यावर कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी त्यांना अटक करावी. त्यांनी सत्संगाचं आयोजन केलं तेव्हा नीट व्यवस्था का केली नाही?
दुर्गविजय सिंह यांनी सांगितलं की, बाबा गावामध्ये पत्नीचा भाऊ मेवाराम याच्या घरी नोकर पाठवायचे. हे प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण... कोणालाच मानत नाहीत. तो स्वतःला देव म्हणतात. सूदर्शन चक्र घेऊन आणखी काय काय नाटक करायचे काय माहीत. तसेच गावातील आणखी एक ग्रामस्थ प्रेमपाल सांगतात की, बाबा दारू प्यायचे. पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी.
गावातील महत्त्वाच्या मंडळीपैकी एक असलेल्या संगीता यांनी भोले बाबा यांच्या सत्संगाला आमच्या गावातील लोक कधीच गेले नाहीत. त्यांच्याच समाजातील लोक जास्त जायचे. पोलिसांनी त्यांची चौकशी करावी अशी आमची इच्छा आहे. याच गावात बाबांचं लग्न झालं. यानंतर नोकरी मिळाली. आम्हाला त्यांच्यात कोणतीही शक्ती दिसली नाही असं म्हटलं आहे.