उत्तर प्रदेश येथील हाथरसमध्ये काही दिवसापूर्वी चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तप्रदेशात गोंधळ उडाला आहे, पोलिसांनी आरोपींची चौकशीची सुरू केली आहे. दरम्यान, आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसला पोहोचले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी साडेसातच्या सुमारास अलीगढला पोहोचले. पिलखाना गावातील हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांची त्यांनी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. येथून ते हाथरसला जाणार आहेत. या चेंगराचेंगरीत या गावातील तीन महिला आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. येथून ते हाथरसला जातील. राहुल गांधी रात्री ९.१५ वाजेपर्यंत येथे थांबतील. राहुल गांधी हाथरस जिल्हा रुग्णालयालाही भेट देणार आहेत. तेथे राहुल गांधी जखमींना भेटून त्यांची प्रकृती जाणून घेणार आहेत. यानंतर दिल्लीला रवाना होतील. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अजय राज, सहारनपूरचे खासदार इम्रान मसूदही उपस्थित आहेत.
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना
हाथरसच्या फलराई गावात मंगळवारी सूरज पाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील एसआयटीचा तपास अहवाल आज शुक्रवारी सरकारला सादर केला जाणार आहे. एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात डीएम-एसएसपीसह १३२ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात साकार हरी भोले बाबा यांचेही नाव आहे. पथकाकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होती.
मंगळवारी झालेल्या अपघातानंतर सरकारने एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. यामध्ये विभागीय आयुक्त चैत्रा बी. यांचाही समावेश होता. अपघातानंतर बुधवारी सकाळपर्यंत मदत आणि बचाव कार्य आणि त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांचा दौरा यामुळे एसआयटीच्या तपासाला गती मिळू शकली नाही.
हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड!
हाथरसमधील सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. बाबा भक्तांकडून पैसे घेत नव्हते तरीही त्यांची प्रत्येक शहरात मोठी मालमत्ता आहे. या बाबांची भक्तांमध्ये वेगवेगळी नाव आहेत. नारायण साकार हरी, विश्व हरी, भोले बाबा पण त्यांचे खरे नाव सूरजपाल सिंह जाटव आहे. वय सुमारे ५८ असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूरजपाल सिंह जाटव हे त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचा पेहराव पाहून ते बाबा आहेत असे कोणीही म्हणू शकत नाही आणि अनेक राज्यात त्यांचे हजारो भक्त आहेत. आता हळूहळू बाबांचे रहस्य उघड होत आहे. हातरस दुर्घटनेनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, मात्र एफआयआरमध्ये बाबांचे नाव नाही. एफआयआरमध्ये नाव नसतानाही बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.