शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 9:23 AM

यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे

काश्मीर -  शस्त्राच्या बळावर विरोध करण्याचा त्याग करून मी गांधीवादी मार्ग स्वीकारला आहे. संयुक्त स्वतंत्र काश्मीरच्या उद्देशाने १९९४ साली मी सशस्त्र संघर्ष सोडला त्यानंतर आता गांधीवादी पद्धतीने मी विरोध करत आहे असं प्रतिज्ञापत्र जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष फुटिरतावादी नेते यासीन मलिकनं कोर्टात दिलं आहे. जेकेएलएफ वायवर बंदी आणण्याच्या निर्णयावरून कोर्टात मलिकने हा दावा केला आहे. 

यूपीए कोर्टाद्वारे मागील महिन्यात जारी केलेल्या आदेशात यासीन मलिकच्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख आहे. गुरुवारी ४ ऑक्टोबरला हे प्रकाशित करण्यात आले. ज्यात जेकेएलएफ वाय या संघटनेला बेकायदेशीर कारवायावरील निर्बंध अधिनियम १९६७ अंतर्गत पुढील ५ वर्षासाठी बेकायदेशीर संघटना घोषित करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. TOI रिपोर्टनुसार, यासीन मलिने त्याच्या प्रतिज्ञापत्रात दावा केलाय की, फुटीरतावाद्यांनी उपस्थित केलेल्या काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी केंद्रातील राजकीय आणि सरकारी अधिकारी १९९४ पासून जोडले गेले आहेत असं त्याने सांगितले.

प्राथमिक शूटर म्हणून प्रसिद्धीझोतात

यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारा आरोपी म्हणून त्याची ओळख पटली. यासीन मलिकला मे २०२२ मध्ये दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यादरम्यान त्याने दावा केला होता की ९० च्या दशकात विविध सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला चर्चेद्वारे हा वाद सोडवण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय जेव्हा तो एकतर्फी युद्धविराम सुरू करेल तेव्हा त्याच्या आणि JKLF-Y संघटनेतील सदस्यांवरील सर्व खटले मागे घेतले जातील.

यासीन मलिक काश्मीरच्या राजकारणात सक्रिय होता. तरुणांना भडकावण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात त्याचा महत्त्वाचा हात मानला जातो. मलिक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने JKLF वर बंदी घातली होती. यासीन मलिकनं १९९० मध्ये हवाई दलाच्या ४ जवानांची हत्या केल्याची कबुलीही दिली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद