लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नुकताच सर्वत्र महिला दिन साजरा झाला आणि विविध क्षेत्रांत महिलांच्या योगदानाचा गौरवही झाला. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना, राजकारणात महिलांचे प्रमाण किती यावरही चर्चा होत आहे. लोकसभेचा विचार करता, १९५२ पासून आजवर झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक महिला खासदार २०१९ मध्ये निवडणूक आल्या.
पहिल्या निवडणुकीत २२ महिला विजयी
देशात १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत २२ महिला लोकसभेत जिंकून गेल्या होत्या. दुसऱ्या लोकसभेतही हे प्रमाण समान होते.
स्मृती इराणी
पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री स्मृती इराणी यांनी २०१९ च्या लोकसभेत अमेठीतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यंदा अमेठीतून पुन्हा लढत आहेत.
माधवी लता
हैदराबादमध्ये एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात भाजपने डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली. त्यांचे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात योगदान आहे.
ॲनी राजा
सीपीआयचे महासचिव डी. राजा यांच्या पत्नी ॲनी राजा यांना पक्षाने वायनाडमधून उमेदवारी दिली. राजा यांचा सामना राहुल गांधी यांच्याशी आहे.
मला मतदारांना काही सांगायचंय..
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात काय कामगिरी केली, ते मला मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे. (कल्पना सोरेन या लोकसभेच्या उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबतचे त्यांचे स्पष्टीकरण.) - कल्पना सोरेन, हेमंत सोरेन यांच्या पत्नी
काय संदेश दिला या लोकशाहीने?
भाजपची प्रतिमा बंगालविरोधी, जमीनदारांचा पक्ष अशी आहे. त्यात गोयल यांचा राजीनामा. काय संदेश दिला आहे जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीने? (निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी शनिवारी राजीनामा दिला. त्याबाबत पत्रकारांना त्यांनी दिलेले उत्तर.) - सागरिका घोष, खासदार, तृणमूल काँग्रेस.