हॉकर्सचा कडकडीत बंद सिंधी कॉलनीत तणाव: बळीराम पेठ, न्यू बी.जे.,फुले मार्केटमध्ये व्यवसाय ठप्प
By admin | Published: May 11, 2016 12:23 AM
जळगाव : हॉकर्सने दिलेल्या बंदची हाक मंगळवारी परिणामकारक ठरली. शहरातील बळीराम पेठ, न्यु. बी.जे. मार्केट, फुले मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंधी कॉलनीत बंद पाळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होऊन तणाव निर्माण झाला होता मात्र तेथील भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केल्याने हा तणाव निवळला.
जळगाव : हॉकर्सने दिलेल्या बंदची हाक मंगळवारी परिणामकारक ठरली. शहरातील बळीराम पेठ, न्यु. बी.जे. मार्केट, फुले मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंधी कॉलनीत बंद पाळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होऊन तणाव निर्माण झाला होता मात्र तेथील भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केल्याने हा तणाव निवळला. हॉकर्स संघर्ष समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १० मे पासून बेमुदत व्यवसाय बंद ठेवत सहकुटुंब आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सर्व हॉकर्सने आज पासून बेमुदत व्यवसाय बंद आंदोलन सुरू केले. बळीराम पेठेपासून सुरुवातसकाळी बळीराम पेठेपासून बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. शहराचा प्रमुख भाजी बाजार याच परिसरात भरतो. हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले होते. तेथून सुभाष चौक, न्यु. बी.जे. मार्केटकडे हॉकर्स फिरत होते. तेथेही भाजी विक्री बंद होती. फुले मार्केटमध्ये रेडिमेड कपडे, कटलरी यासह विविध वस्तू विक्रीच्या गाड्या लागतात. दीडशे ते दोनशे गाड्या या मार्केटमध्ये असतात मात्र आज येथे सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. सिंधी कॉलनीत वादसिंधी कॉलनीत भाजी विक्रेत्यांनी सकाळपासूनच व्यवसाय सुरू केला होता. बंदचे आवाहन करणारे हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आल्यानंतर या परिसरात गोंधळ निर्माण झाला. काही व्यावसायिक व्यवसाय बंद करत नसल्याने वाद चिघळला. अखेर सिंधी कॉनीतील काही व्यावसायिकांनी समजुतीने घेत व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणाहून निघून गेले. विविध भागात रस्त्यावर बसणार्या व्यावसायिकांनाही बंदचे आवाहन करण्यात येत होते.