हॉकर्स स्थलांतराला लाभला मुहूर्त स्टेशनरोडला विरोध :फुले विक्रेत्या महिलेशी वाद ; पोलीस बंदोबस्त
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात केली. शिवाजी पुतळ्याकडून गोलाणी मार्केटकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमित ओटा काढत असताना व रेल्वे स्टेशन परिसरातील विरोधाच्या घटने व्यतिरिक्त ही मोहीम पहिल्या दिवशी शांतेत झाली. या काळात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशन परिसरातून पाच गाड्या जप्त करण्यात आल्या.
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात केली. शिवाजी पुतळ्याकडून गोलाणी मार्केटकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमित ओटा काढत असताना व रेल्वे स्टेशन परिसरातील विरोधाच्या घटने व्यतिरिक्त ही मोहीम पहिल्या दिवशी शांतेत झाली. या काळात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशन परिसरातून पाच गाड्या जप्त करण्यात आल्या. शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. या आदेशानुसार जास्त अतिक्रमणे असलेली ठिकाणी महापालिकेने निित केली आहेत. गेल्या ३ फेबु्रवारी रोजी या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार होती. मात्र अतिक्रमणे काढण्यात येणार्या हॉकर्सला ज्या ठिकाणी पर्यायी जागा दिल्या जाणार होत्या तेथे कोणत्याही सुविधा वा सूचनांचे पालन अतिक्रमण व लाईट विभागाकडून करण्यात आले नव्हते. त्यामुळे ठरविलेल्या दिवशी ही कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. ८ पासून या कारवाईचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला होता. ------या दिल्या जाणार होत्या सुविधादिलेल्या जागांचे सपाटीकरण करणे, तेथील साफसफाईच्या कामांची पाहणी करून कामे झाली नसल्यास ती करून घेणे, या भागात लाईटची व्यवस्था करून देणे आदी सुविधा देण्याचे आदेश होते. मात्र यापैकी एकही सुविधा न दिल्याने ३ फेब्रुवारीला ही मोहीम राबविता आली नव्हती. -----