नवी दिल्ली : केंद्र सरकार आपली आश्वासने पाळत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ आॅक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अण्णा हजारे यांनी सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार भाव देण्यासंदर्भात अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना तब्बल ३0 पत्रे लिहिली. दिल्लीच्या रामलीला मैदानात मार्चमध्ये केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने ११ मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी पुन्हा अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला ७ पत्रे लिहिली; पण अण्णांना साधे उत्तरही दिले नाही.
अण्णा हजारे आंदोलन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:59 AM