आपले झाले परके... तो तापाने फणफणत होता; पण कोरोनाच्या संशयाने नातेवाईकांनी घराबाहेर काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:50 PM2020-06-11T17:50:03+5:302020-06-11T17:57:44+5:30

कोरोना संकटाच्या काळात आपले आपले राहिले नसून ते परके झाले झाल्याचे दर्शवणारी घटना भोपाळमध्ये घडली आहे.

He became a stranger for family ... he was feverish; But Corona's suspicions thrown out from the house! | आपले झाले परके... तो तापाने फणफणत होता; पण कोरोनाच्या संशयाने नातेवाईकांनी घराबाहेर काढलं!

आपले झाले परके... तो तापाने फणफणत होता; पण कोरोनाच्या संशयाने नातेवाईकांनी घराबाहेर काढलं!

googlenewsNext
ठळक मुद्देभोपाळमध्ये राहणाऱ्या एका ४९ वर्षीय अविवाहित व्यक्तीला कोरोना संशयित असल्याने घराबाहेर काढून बेघर करण्यात आलं. जेव्हा मंगळवारी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला घरच्यांनी कोरोना संशियत समजून घराबाहेर काढलं, अशी माहिती त्याने दिली. 

भोपाळ -  देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे कोरोनाबाधिताशी नाही. कोरोनाबाधितांना हीन वागणूक देऊ नका असे वारंवार सरकारकडून सांगितले जाते. मात्र असे असूनही कोरोना संकटाच्या काळात आपले आपले राहिले नसून ते परके झाले झाल्याचे दर्शवणारी घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या एका ४९ वर्षीय अविवाहित व्यक्तीला कोरोना संशयित असल्याने घराबाहेर काढून बेघर करण्यात आलं. इतरत्र भटकल्यानंतर संध्याकाळी हबीबगंज रेल्वे स्टेशन त्याने गाठलं आणि आग्राचे तिकिट घेतले. त्यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी पाहिलं तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा ही व्यक्ती तापानं अक्षरशः कापत होती.

चौकशी दरम्यान या व्यक्तीचे नाव ओमकार असल्याचं समजलं. त्याने एका दिवसाआधीच त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्याआधीच तो भोपाळ सोडून जाण्याची तयारी करत होता. त्याला बऱ्याच दिवसांपासून खोकला आणि ताप होता. जेव्हा मंगळवारी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला घरच्यांनी कोरोना संशियत समजून घराबाहेर काढलं, अशी माहिती त्याने दिली. 

हबीबगंज स्टेशनवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय ताफ्यात सामील झालेल्या डॉ. अमित मुखर्जी आणि डॉ. नवनीत आर्य यांनी ओमकारकडे टेस्ट सॅम्पल घेतल्याचा पुरावा मागितला असता त्यानं मोबाईलवर आलेला मेसेज दाखवला. या पथकाने स्टेशनवर कार्यरत स्वयंसेवकांच्या मदतीने ओमकारला स्टेशपासून दूर असलेल्या एका बाकावर बसवले आणि कंट्रोल रूममधील नोडल अधिकारी डॉ. उपेंद्र धोटे यांच्याशी चर्चा केली. सुमारे दीड तासानंतर रुग्णवाहिका स्टेशनवर आली आणि त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

Web Title: He became a stranger for family ... he was feverish; But Corona's suspicions thrown out from the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.