शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
4
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
5
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
6
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
7
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
8
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
9
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
10
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
11
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
12
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
13
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
14
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
15
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
16
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
17
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
18
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
19
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
20
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 8:13 PM

जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती ती आता बदलायला हवी, कायदा कधीही अंध नसतो. तो सर्वांना समान पाहतो.

नवी दिल्ली - तुम्ही अनेक सिनेमात कोर्टाच्या चित्रिकरणात डोळ्यावर पट्टी बांधलेली न्याय देवतेची मूर्ती पाहिलेली आहे. परंतु आता भारतात न्याय देवतेचे डोळे उघडले आहेत. सुप्रीम कोर्टाने लेडी ऑफ जस्टिस म्हणजे न्यायदेवीची नवीन मूर्ती समोर आणली आहे. या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली आहे. कायद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्याला काही दिसत नाही असं चित्र निर्माण होत होते, ते बदलण्यासाठी आता नवीन मूर्ती आणली आहे. ही मूर्ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या लायब्रेरीत लावण्यात आली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ही नवी मूर्ती सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी ऑर्डर देऊन बनवली आहे. यामागचा हेतू म्हणजे आता देशात कायदा आंधळा नाही किंवा शिक्षेचे प्रतिक नाही. न्यायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोर्टात ठेवलेली ही मूर्ती लेडी ऑफ जस्टीस नावाने ओळखली जात होती. न्याय देवतेची आतापर्यंत ही प्रतिमा सगळीकडे वापरण्यात येत होती. त्यात डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसायची, जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती ती आता बदलायला हवी, कायदा कधीही अंध नसतो. तो सर्वांना समान पाहतो.

काय आहे नवीन मूर्तीमध्ये खास?

न्याय देवतेची नवीन मूर्ती पूर्ण सफेद रंगाची आहे.

प्रतिमेत न्याय देवतेला भारतीय वेशभुषेत दाखवण्यात आलं, त्यात प्रामुख्याने साडी दिसते. 

डोक्यावर सुंदर मुकूट आहे, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपारिक आभूषण आहेत

न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान पकडल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, अलीकडेच भारताने ब्रिटीशकालीन लागू असलेले इंडियन पीनल कोड कायद्यात बदल करून भारतीय न्याय संहिता कायदा लागू केला होता. लेडी ऑफ जस्टीस मूर्तीमध्ये बदल करणे याचाच एक भाग मानलं जाते. नव्या मूर्तीत एका हातात संविधान आहे, तलवार नाही. न्याय संविधानानुसार दिला जातो हा संदेश देशाला मिळायला हवा. तलवार हिंसेचे प्रतिक आहे, परंतु कोर्ट संविधानातील कायद्यावर चालते. न्याय देवतेची ही प्रतिमा यूनानमधून आली, न्यायाचं प्रतिक म्हणून तिथे प्राचीन देवी आहे. तिचं नाव जस्टिया होते, त्याच नावाने जस्टिस शब्द तयार झाला. डोळ्यावर पट्टी बांधणे म्हणजे न्याय देवी नेहमी निष्पक्षपणे न्याय करेल. कुणालाही पाहून न्याय करताना एकाची बाजू घेतली जाईल त्यामुळे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचं सांगितले जाते. यूनानमधून ही प्रतिमा ब्रिटनमध्ये पोहचली. १७ व्या शतकात एक इंग्रजी अधिकारी ते भारतात घेऊन आले. ब्रिटीशांच्या काळात १८ व्या शतकात न्याय देवतेची ही मूर्ती सार्वजनिक वापरात आली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय