शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 8:57 PM

भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देभारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली सोमवीर असे या जवानाचे नाव आहेकेवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानाने देशाशी गद्दारी केल्याचे उघड

जयपूर - भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली होती. सोमवीर असे या जवानाचे नाव असून, त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानाने देशाशी गद्दारी केल्याचे उघड झाले आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवणाऱ्या या हनिट्रॅपच्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. या महिलेने सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रे पाठवली होती. त्याबदल्यात या जवानाने  लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती  या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले. दरम्यान, या प्रकरणाल लष्कराचे 50 जवान तपास यंत्रणांच्या रडावर असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.  दरम्यान, महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानानं व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित जवानाला आज अटक करण्यात आली होती. या जवानाला आता चौकशीसाठी जयपूरला आणण्यात आले आहे.    राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी या माहितीला दुजोरा दिला. सोमवीर नावाच्या जवानाला शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्याला जयपूरला आणण्यात आलं. सध्या त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं एक विशेष पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याच्यावर नजर ठेवून होते.  पाकिस्तानमधील एका महिलेनं जवानाला हनी ट्रॅप केल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. सोमवीर या महिलेला सैन्याशी संबंधित गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर या महिलेला प्रशिक्षणादरम्यान भेटल्याची माहिती चौकशीतून समोर आली. जसलमेरमध्ये तैनात झाल्यावर सोमवीरनं संबंधित महिलेला संवेदनशील माहिती व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दिल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच सोमवीरवर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndian Armyभारतीय जवानRajasthanराजस्थान