सुरत - गुजरातमधील लवजी हे सरकारी नोकरीमध्ये होते, गुजरात परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्य ते कंडक्टर म्हणून कार्यरत होते. कडंक्टर म्हटल्यावर पगार कमीच, त्यामुळे साहजिकच घर-कुटुंब चालविणे अवघड बनले होते. त्यामुळे, स्वत:च काहीतरी करायच्या विचार पक्का करुन त्यांनी नोकरीचा राजीना देऊन आपलं गाव गाठलं. सुरुवातीला गावात कपड्याचा व्यापार त्यांनी सुरु केला. मात्र, त्यामध्ये अपयश आल्यामुळे आपला पारंपरीक शेती व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. शेतीच्या उत्पनासाठी अमेरिकन कॉर्न म्हणजे मका शेतीची निवड लवजी यांनी केली. या शेतीच्या व्यवसायात त्यांना चांगलाच फायदा झाला.
लवजी यांनी नोकरी सोडल्यानंतर सुरतमध्ये टेक्सटाईलचा उद्योग सुरू केला होता. काही दिवसांतच त्यांचा हा उद्योग बऱ्यापैकी जम धरत होता. मात्र, गुजरातमध्ये आलेल्या महापुराने त्यांच्याही उद्योगधंद्यावर पाणी फेरले. त्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने कपड्याचे आणि मशनिरींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीमुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. अनेकदा खाण्याचेही वांदे होत, त्यामुळे मक्याची कणसं खाऊन ते जगत होते. त्यातूनच आयडिया आल्यानंतर त्यांनी मक्याची शेती करण्याचा विचार केला.
मक्याच्या कणसाने दिलेली आयडिया घेऊन त्यांनी आपल्या शेतात मक्याची झाडे लावली. सुरुवातीचे तीन वर्षे म्हणावे तेवढे यश मिळाले नाही, पण मक्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचदरम्यान, अमेरिकन कॉर्नची बाजारात चलती होती, पण सुरतमध्ये त्याचे प्रमाण अधिक नव्हते. लोकांच्या याबाबत अधिकची माहिती नव्हती. त्यामुळे, लवजी यांनी अमेरिकन कॉर्नच्या शेतीचा प्रयोग केला. अमेरिकन कॉर्नच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्यांना शेती व्यवसायात चांगलाच फायदा झाला.
लवजी आपल्या शेतातील अमेरिकन कॉर्न तोडून बाजारात आणतात, आणि आपल्या शेतात जाऊन विकतात. हळूहळू त्यांचा ग्राहकवर्ग वाढीस लागला असून राजकोटमध्ये त्यांची दोन दुकानेही आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्न ते आपल्या दुकानातून विकतात, नुकतेच त्यांनी कॉर्न सूपही विकायला सुरुवात केली आहे. येथील तरुणाईमध्ये या अमेरिकन कॉर्नची मोठी क्रेझ आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात हे सूप पिण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी असते. मक्याच्या शेतीसाठी विशेष जमिन लागत नाही. भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मक्याची पेरणी केली जाते. त्यानंतर, तीन महिन्यांनी हे पीक बाजारात येते.