शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

एका पायावर तीन किलोमीटर धावत त्यांनी टाळला मोठा रेल्वे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 2:35 PM

आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणे सर्वांनाच जमतंच असं नाही. पण एका गृहस्थांनी एक पाय अधू असतानाही तीन किलोमीटर धावत मोठा रेल्वे अपघात टाळला.

उडुपी -  आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणे सर्वांनाच जमतंच असं नाही.मात्र उडुपी येथील कृष्णा पुजारी यांनी एक पाय अधू असतानाही तब्बल तीन किलोमीटर धावत तुटलेल्या रेल्वे रुळांची माहिती अधिकाऱ्यांना देऊन मोठा रेल्वे अपघात टाळला. कोरंगपाडी येथील रहिवासी असलेल्या 53 वर्षीय कृष्णा पूजारी यांचा डावा पाय काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अधू झाला होता. त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही. पायाचे दुखणे कमी व्हावे म्हणून त्यांना डॉक्टरांनी दररोज सकाळी नियमित चालण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, शनिवारी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांनी वाटेत रेल्वे ट्रॅकच्या रुळाला तडे गेल्याचे पाहिले. आता काय करावं याचा विचार ते करत असतानाच अचानक एक ट्रेन त्या रुळांवरून धडधडत गेली. त्यामुळे रूळ तुटला. या आणीबाणीच्या वेळी कृष्णा यांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे कार्यालयाच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. अधू पायानिशी सुमारे तीन किलोमीटर धावत त्यांनी रेल्वे रूळ तुटल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन रेल्वे गाड्यांना तातडीने थांबण्याची सूचना दिली. एक रेल्वे घटनास्थळापासून सात किमी अंतरावर तर दुसरी गाडी 16 किमी अंतरावर थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेKarnatakकर्नाटक