उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. दरम्यान, आता कामगारांच्या नातेवाईकांची समोर येत आहेत. नातेवाईकांनी समाधान व्यक्त केल आहे.
आनंदाची बातमी! १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ पैकी ४१ मजूर बाहेर
झारखंड येथील एका कामगाराचे वडिल अनिल बेदिया भावूक होऊन म्हणाले की, माझा मुलगा मला न सांगताच उत्तराखंडमध्ये कामाला गेला होता, आता तो परत आल्यावर तो पुन्हा कधीही बाहेर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असंही बेदिया म्हणाले.
१७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ पैकी ४१ मजूर बाहेर
उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, आता एनडीआरएफच्या प्रयत्नांना यश आले आहे. एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. बचाव पथकांनी बोगद्याच्या वरून खोदकाम आणि उभ्या ड्रिलिंग केले. पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेर पडलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी सुरू आहे. उर्वरित कामगारांनाही एक एक करून बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्याच्या आत आहेत.