नवी दिल्ली - कोविड संक्रमितांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने क्लीनिकल गाइडलाइनमध्ये बदल केले आहेत. केंद्राच्या दिशा निर्देशानुसार, डॉक्टरांनी रुग्णांना स्टेरॉयड देण्याचं टाळावं. विशेष म्हणजे खोकला असताना ट्यूबरक्लोसिसची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही गाइडलाइन टास्क फोर्सचे प्रमुख दुसऱ्या लाटेच्या औषधांच्या ओवरडोसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर जारी करण्यात आल्या आहेत. बदललेल्या नियमानुसार, स्टेरॉयड म्यूकरमाइकोसिस म्हणजे ब्लॅक फंगससारख्या धोकादायक इंफेक्शनला चालना देऊ शकतं.
वेळेपूर्वी स्टेरॉयडचा वापर अथवा खूप काळ स्टेरॉयडचा हायडोस देण्याच्या चुकीमुळे हा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. स्टेरॉयड केवळ वेळ पडल्यास सौम्य, मध्यम अथवा गंभीर लक्षणांच्या आधारावरच रुग्णांना देण्यात यावी असं सांगण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास अथवा हायपोक्सियासारख्या लक्षणांना माइल्ड डीसीज मानलं जाईल. अशावेळी केवळ होम आयसोलेशन अथवा घरगुती देखरेखीखाली राहण्याचा सल्ला आहे. माइल्ड कोविड संक्रमणात फक्त आरोग्य सुविधा घेऊ शकता जेव्हा ५ दिवसांहून अधिक काळ ताप, श्वास घेण्यास अडचण होत असेल.
त्याशिवाय श्वास घेण्यास त्रास यासह कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजन सॅच्युरेशन ९०-९३ च्या दरम्यान असेल तर अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाऊ शकते. अशा प्रकरणांना मॉडरेट केस म्हणून पाहिले जाईल. काही रुग्णांना आवश्यकता भासल्यास ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले जाऊ शकतं. रेस्पिरेटरी रेट प्रती ३० मिनिटांहून अधिक, श्वास घेण्यास त्रास अथवा रुम एअरमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन ९० पेक्षा कमी असल्यास अशा प्रकरणात गंभीर मानलं जाईल. अशी समस्या रुग्णांना उद्भवल्यास तात्काळ त्यांना आयसीयूमध्ये दाखल करायला हवं. कारण रेस्पिरेटरी सपोर्टची गरज भासू शकते.
मध्यम ते गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी रमेडेसिविरचा आपत्कालीन उपयोग केवळ डॉक्टरांच्या शिफारशीनंतर करण्यात यावा. ऑक्सिजन अथवा होम सेटिंग्समध्ये न राहणाऱ्या रुग्णांच्या वापरासाठी ड्रगचा वापर करण्यावरुन सतर्क केले आहे. गाइडलाइननुसार, EUA अथवा टोसिलिजुमैब औषधाचा वापर गंभीर रुग्णांवर केला जाऊ शकतो. २४ ते ४८ तासांमध्ये गंभीर लक्षण अथवा आयसीयूतील रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ६० पेक्षा जास्त वय असलेल्या कार्डियोवस्कूलयर डीसीज, हायपरटेंशन, कोरोनरी, आर्टरी डीसीज, डायबिटीज अथवा इम्यूनोकॉम्प्रोमाइल्ड स्टेटसारख्या रुग्ण गंभीर आजारी पडल्यास त्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे.