नवी दिल्ली - कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा होती. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंड केले आहे. यासंदर्भात बोलताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी, सध्या देशात कोरोना कम्यूनिटी ट्रान्समिशन नव्हे तर लोकल ट्रान्समिशन स्टेजलाच असल्याचे स्पष्ट केले आहे.
अग्रवाल म्हणाले, सध्या अशी परिस्थिती आहे, की आम्ही कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर 'कम्यूनिटी' शब्द लिहिला, की लोक त्याचा दुसराच अर्थ लावतात. आम्ही लिमिटेड कॉन्टेस्टमध्ये एका ठिकाणी कम्यूनिटी शब्दाचा प्रयोग केला आहे. मी स्पष्ट करू इच्छितो, की भारत अद्यापही लिमिटेड ट्रान्समिशन स्टेजलाच आहे. आम्हाला वाटलेच, की आपण कम्यूनिटी ट्रान्समिशनकडे जात आहोत, तर आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा जनतेला आवाहन करू, की आता आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप तशी परिस्थिती ओढवलेली नाही. सध्या जे नियम घालून दिले आहेत त्याचे योग्य प्रकारे पालन केले जावे. एवढेच आमच्यापुढे आव्हान आहे.
देशात आतापर्यंत 1071 जणांना कोरोनाची लागण -देशात आतापर्यंत 1071 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 29 जणांचा मृत्यू झाल आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 92 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात कोरोना बाधितांची संख्या 100वरून 1000वर जाण्यासाठी 12 दिवस लागले आहेत. या तुलनेत इतर देशांत आठ हजारपर्यंत संक्रमित रुग्ण आढले आहेत. हे देश विकसित असताना आणि तेथील लोकसंख्या कमी असतानाही एवढे लोक तेथे आढळून आले आहेत. आपल्या देशातील जनतेचे सहकार्य आणि सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय यामुळेच आपण येथे कोरोना बाधितांची संख्या रोखू शकलो. आपण सोशल डिसटंसिंग आणि लॉकडाऊनचा योग्य पद्धतीने वापर केला आहे, असे अग्रवाल म्हणाले.
अग्रवाल म्हणाले, मी देशातील जनतेला सांगू इच्छितो, की त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करावे. अन्यथा आज आपण जे यश मिळवले आहे. ते पुन्हा शून्यही होऊ शकतो. यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घालून दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे.
इतर देशांत एका व्यक्तीने शंभहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. एवढेच नाही, तर एका संक्रमित व्यक्तीच्या निश्काळजीपणामुळे तेथे कोरोनाने महामारीचे रूप धारण केले आहे. आपल्याला अशा स्थितीपासून देशाला वाचवायचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय ?कोरोना व्हायरसच्या संक्रमाणाच्या चार स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये केवळ प्रभावित देशांतून आलेल्या लोकांमध्येच कोरोना दिसून येतो. संक्रमित देशांतून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित होण्याला लोकल ट्रांसमिशन स्टेज, असे म्हटले जाते. जेव्हा परदेशातून आलेल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याच्या कुटुंबीयांना, नातलगांना संक्रमण होते. या स्टेजला व्हायरस कुठून पसरतो हे समजते.
तिसरी स्टेजला कम्युनिटी ट्रांसमिशन स्टेज म्हटले जाते. या स्टेजला एकाच भागातील अधिक लोक संक्रमित होतात. या स्टेजला एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित देशातून आलेली नसते किंवा तेथून आलेल्या कुण्या व्यक्तीच्या संपर्कातही आलेली नसते. या स्टेजला संबंधित व्यक्ती कुणामुळे संक्रमित झाला हे कळत नाही. चौथ्या स्टेजला संक्रमण संपूर्ण भागात पसरते. या स्टेजमधून सर्वात पहिले चीन गेला आहे.