नवी दिल्ली: कोरोना महामारीत आणि त्यानंतर देशभरात विविध प्रकारच्या औषधांची विक्री झपाट्याने वाढली. परंतू, यातील अनेक औषधं डॉक्टरांच्या सल्लाशिवाय(प्रिस्क्रीप्शन) दिल्या जातात आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढला आहे. या धोक्यामुळे केंद्र सरकारने अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीनला महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवले आहे. रॅनिटिडीन एसीलोक, जिनेटॅक आणि रँटेक नावाने बाजारात विकली जाते. प्रामुख्याने पोटदुखीसाठी या औषधाचा वापर केला जातो. केंद्राने एकूण 26 औषधांना या यादीतून हटवले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्वाच्या औषधांची राष्ट्रीय यादी (एनएलईएम) जारी केली आहे, यात 384 औषधे सामील आहेत. यातच आता केंद्र सरकारने हटवलेल्या 26 औषधांचे अस्थित्व संपुष्टात येणार आहे. रॅनिटिडीनमुळे कँसरचा धोका असल्याची माहिती समोर आल्यापासून जगभरात यावर संशोधन केले जात आहे. यामुळेच आरोग्य मंत्रालयाने भारतीय औषध महानियंत्रक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(AIIMS) शी चर्चा केल्यानंतर, या औषधाला यादीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
रॅनिटिडीनने कँसर होण्याचा धोकाया औषधावर 2019 पासून संशोदन होत आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनला औषधात कॅन्सरला पोषक असलेले अॅसिड आढळले आहे. औषध नियामकांना रॅनिटिडिनयुक्त औषधांच्या नमुन्यामध्ये कँसर तयार करणारे एननायट्रोसोडिमीथाइलमाइन (एनडीएमए)आढळले होते. यामुळे कॅन्सर होण्याचा दाट धोका असतो. रॅनिटिडीनशिवाय इतर अनेक औषधांना या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे, त्या औषधांमध्येही विविध आजारांना पोषक घटक आढळले आहेत.
या 26 औषधांना सरकारने यादीतून काढले1. अल्टेप्लेस2. अॅटेनोलोल3. ब्लीचिंग पाउडर4. कॅप्रोमायसीन5. सेट्रिमाइड6. क्लोरफेनिरामाइन7. दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट8. डिमेरकाप्रोलो9. एरिथ्रोमायसीन10. एथिनील एस्ट्राडीयोल11. एथिनिल एस्ट्राडियोल (ए) नोरेथिस्टरोन (बी)12. गॅनिक्लोवीर13. कनामायसीन14. लॅमिवुडिन (ए) + नेविरापीन (बी) + स्टावूडीन (सी)15. लेफ्लुनोमाइड16. मेथिल्डोपा17. निकोटिनामाइड18. पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए, पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी19. पेंटामिडाइन20. प्रिलोकेन (ए) + लिग्नोकेन (बी)21. प्रोकार्बाजिन22. रॅनिटिडीन23. रिफाब्यूटिन24. स्टावूडीन (ए) + लॅमिवुडीन (बी)25. सुक्रालफेट26. पेट्रोलेटम