नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांच्या संख्येन तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने दिवसाला एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. एक रुग्णवाहिका कोरोना रुग्णाला घेऊन जात होती. मात्र रस्त्यातच पीपीई किटमध्ये असलेले आरोग्य कर्मचारी ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
पीपीई किटमध्ये असलेले आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्ण सोबत असताना देखील रुग्णवाहिका थांबवून ऑर्डर केलेल्या ऊसाचा रसची वाट पाहत होते. हे पाहून अनेकांना धक्का बसला त्यांनी या कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता. एकाने 'कोरोना त्याला झाला आहे, मला नाही" असं उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडोमध्ये आरोग्य कर्मचारी ऊसाचा रस पिण्यासाठी थांबला होता. रस्त्यावर उभं राहून तो ऊसाचा रस येण्याची वाट पाहत असताना त्याचे सहकारी रुग्णवाहिकेत बसलेले होते. यावेळी त्याचा मास्क तोंडावर नव्हता, जे स्पष्टपणे नियमांचं उल्लंघन होतं. यावेळी अनेक लोक आरोग्य कर्मचाऱ्याच्या शेजारून जाताना दिसत आहेत.
कोरोना रुग्णाला घेऊन जात आहात आणि मास्कही व्यवस्थित घातलेला नाही असं सांगत तिथे उपस्थित एका व्यक्तीने आक्षेप नोंदवला. त्यावेळी हे सर्व कॅमेऱ्यावर रेकॉर्ड होत असल्याचं कळतात कर्मचाऱ्याने आपला मास्क वरती ओढून घेतला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल. तसेच दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच ही घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. कोरोना लसीकरणावर करोडो रुपये खर्च केले जात असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. शामली येथील एका आरोग्य केंद्रावर तीन वृद्ध महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या वृद्ध महिलांना अॅन्टी रेबीज लस (Anti Rabies Vaccine) दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यातील एका महिलेची प्रकृती बिघडली असून त्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. वृद्ध महिलांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर गोंधळ घातला. तसेच कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.