नवी दिल्ली - पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे प्रवचन ऐकून मुजफ्फरपूरची नौशिन परवीन उर्फ रुखसानाची आता रुक्मिणी बनली आहे. हिंदू प्रथा परंपरेने तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. तिचा बॉयफ्रेंड रोशन कुंवर हा बिहारच्या वैशाली इथं राहणारा आहे. ४ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. बागेश्वर बाबाचे प्रवचन ऐकून मुलीने हिंदू धर्म स्वीकारण्याचं ठरवले.
धर्म परिवर्तन केलेली रुक्मिणी म्हणाली की, मी बागेश्वार बाबांच्या दरबारात यायचे. त्याठिकाणी त्यांचे प्रवचन ऐकत होती. त्यावेळी मी इस्लाम धर्मात होते. सनातन धर्म स्वीकारून मी लग्न करेन असं मी ठरवले. त्यानंतर वैशाली येथील गंडक नदीत डुबकी मारून तिचे प्रथेनुसार हिंदू धर्म स्वीकारला त्यानंतर बॉयफ्रेंड रोशनसोबत जात मंदिरात लग्न केले.
जयपूरमध्ये झाली प्रेमाला सुरुवात रोशन आणि रुक्मिणी या दोघांमधील प्रेम जयपूरच्या कॉलेजपासून सुरू झाले. कॉलेजमध्ये असताना रोशनची ओळख मुजफ्फरपूरच्या गिजांस इथं राहणाऱ्या रुखसाना अन्सारीसोबत झाली. हे दोघेही बिहारचे होते. पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ४ वर्ष या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते परंतु घरचे तयार नव्हते. एकेदिवशी दोघेही बागेश्वर धामच्या बाबाच्या दरबारात गेले. रुखसाना पंडीत धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन ऐकून प्रभावित झाली. त्यानंतर तिने सनातन धर्म स्वीकारण्याचे ठरवले.
त्यानंतर सर्वात आधी रुखसानाने हिंदू प्रथा परंपरेनुसार धर्म परिवर्तन करत स्वत:चे नाव रुक्मिणी ठेवले. गंडक नदीत विधी पार पडले. मग रोशन आणि रुक्मिणीने मंदिरात जात लग्न केले. या दोघांचे लग्न लावणाऱ्या पंडित कमलाकांत पांडे यांनी सांगितले की, हिंदू प्रथेनुसार या दोघांचे लग्न झाले आहे. मुलगा आणि मुलीने एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचे वचन दिले आहे. यावेळी अनेकांनी या दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.