नवी दिल्ली - काचेची भुकटी (ग्लास कोटेड) वापरून केलेला मांजाची विक्री व वापरावर देशभर बंदी घाला, अशी मागणी करणाºया याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तयारी दाखवली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी चिनी मांजावरील बंदी कायम ठेवली होती.संक्रांतीचा सण येऊ घातला असून, पतंग उडविणाºयांची संख्याही या काळात प्रचंड असते, पण त्यासाठी वापरल्या जाणाºया मांजामुळे अनेक पक्षी तर जखमी होतातच, प्रस्त्याने येणारे-जाणारे पादचारी, दुचाकीस्वार यांनाही इजा होते.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) चिनी मांज्यासह काच भुकटीयुक्त मांजाची विक्री आणि वापरावरसंपूर्ण देशात बंदी घातली. या याचिकेवरील पुढील सुनावणी एक फेब्रुवारी, २०१८ रोजी असून तोपर्यंत ही बंदी कायम राहील.
मांजा बंदीच्या याचिकेवर होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:14 AM