औरंगाबाद : डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद येथे शुक्रवारपासून ‘इन कॅमेरा’ सुरूझालेली सुनावणी शनिवारी औरंगाबादपुरती पूर्ण झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता ढिंग्रा सहगल यांच्यापुढे ‘गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणात’ ही सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर शनिवारी देखील दोन अधिकाऱ्यांची सरतपासणी आणि उलटतपासणी घेण्यात आली. यासंदर्भातील पुढील सुनावणी ४, ५ आणि ६ एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदीबाबत सुनावणी
By admin | Published: March 19, 2017 12:31 AM