बळीरामपेठेतील हॉकर्सचा मनपात तीन तास ठिय्या आयुक्तांनी नाकारले निवेदन: सुनावणीकडे पाठ फिरविल्याने कोर्टात बाजू मांडण्याचा दिला सल्ला
By admin | Published: July 08, 2016 9:17 PM
जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली.
जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली. मनपाने शहरातील सर्व प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील हॉकर्सचे सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थलांतर करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवाजीरोड, गोलाणी मार्केटसमोरील रस्ता, सुभाष चौक रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्यात आले. मात्र बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणीतील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार असताना या हॉकर्सनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दावा फेटाळल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल केले. त्यात ४ जुलै रोजी झालेल्या सुनावणी खंडपीठाने मनपाला ५ रोजी या हॉकर्सची सुनावणी घेऊन मनपाने आधी पाडलेल्या लॉटनुसार या हॉकर्सला गोलाणीतील ओटे ताब्यात देण्याचे व त्याचा अहवाल १३ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने तातडीने ५रोजी शहर अभियंतांना प्राधिकृत करीत त्यांच्या ९व्या मजल्यावरील दालनात सकाळी ११ ते २ या वेळात या हॉकर्सची सुनावणी ठेवण्यात आली होती. त्याबाबत हॉकर्सला लाऊडस्पीकरवरून आवाहनही करण्यात आले होते. मात्र त्याकडे हॉकर्सने पाठ फिरविली. जमावबंदी असल्याने फिरविली पाठयाबाबत हॉकर्स असोसिएशनचे खजिनदार रवी महाजन यांनी सांगितले की, ४ रोजी रात्रीपर्यंत जळगावात आल्यानंतर ५ रोजीच्या सुनावणीसाठी सर्व हॉकर्सला निरोप देणे शक्य नव्हते. तरीही ५रोजी सकाळी १० वाजता पदाधिकारी मनपात आले. मात्र त्यांना पावत्या व नोटरी आदी कागदपत्रे आणण्याचे सांगण्यात आले. त्यातच ईदमुळे जमावबंदी आदेश होता. त्यामुळे ८रोजी हॉकर्स मनपात येईल, असे सांगितले होते, असा दावा महाजन यांनी केला.हॉकर्सचा दावा खोटाशहर अभियंता दिलीप थोरात यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी हॉकर्सचा दावा खोटा असल्याचे सांगितले. ५ रोजीची सुनावणी न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आली. त्यास हॉकर्सने एकेक करून यायचे होते. त्यामुळे जमावबंदीचा विषयच नव्हता,असे स्पष्ट केले.