नवी दिल्ली : आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिल्याच्या संदर्भात मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने बुधवारी सुनावणीसाठी मान्य केली. पत्रकार व लेखक अहमेर खान यांनी दाखल केलेली ही याचिका सुनावणी करण्यास योग्य आहे. त्यामुळे ही याचिका स्वीकृत करण्यात येत आहे, असे महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी स्पष्ट केले.या याचिकेवरील पुढची सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होईल व अर्जदाराला इराणींविरुद्ध समन्सपूर्व कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील, असे न्या. जैन म्हणाले. न्या. जैन यांनी गेल्या १ जून रोजी ही याचिका सुनावणी योग्य आहे की नाही याबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला होता. इराणी यांनी लोकसभा व त्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरताना आयोगासमक्ष जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात त्यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत वेगवेगळी माहिती दिली होती, असे या याचिकेत म्हटले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
इराणींच्या ‘पात्रते’ची होणार सुनावणी
By admin | Published: June 25, 2015 12:08 AM