ऑनलाइन लोकमत - नवी दिल्ली, दि. 24 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेटचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कन्हैय्या कुमारच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालाय 29 फेब्रुवारीला सुनावणी घेणार आहे.जेएनयूच्या 2 विद्यार्थ्यांनी आत्मसमर्ण केले असल्याने दिल्ली पोलिसांनी न्यायालयात कन्हैय्या कुमारच्या कोठडीत वाढ करुन देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांना सर्व प्रक्रिया गुप्तपणे करण्याची सूचना केली आहे. आत्मसमर्पण केलेल्या उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका किंवा इजा होऊ नये यासाठी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना सूचना केली आहे. मंगळवारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना कन्हैय्या कुमारने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास सांगितला होता. कन्हैय्या कुमारने आपल्या जामीन याचिकेत आपण कोणत्याही प्रकारच्या देशद्रोही घोषणा दिल्या नसल्याच सांगितल होत.
कन्हैय्या कुमारच्या जामीन याचिकेवर २९ फेब्रुवारीला सुनावणी
By admin | Published: February 24, 2016 11:41 AM