नवी दिल्ली - निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या सहा प्रकरणांत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय येत्या बुधवारी ८ मे रोजी विचार करणार आहे.मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर आयोग निर्णय घेत नसल्याची तक्रार काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी केली. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने आयोगास ६ मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाने निर्णय घेऊन सर्व सहा प्रकरणांत मोदींना ‘क्लीन चिट’ दिली. याचिकेच्या सुनावणीत याचिका करणाऱ्यांचे ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सहापैकी पाच प्रकरणांचे निर्णय दोन विरुद्ध एक अशा बहुमताने झाले. आयोगाने या असहमतीच्या मताखेरीज निकालपत्रे दिली आहेत. ती आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध नाहीत.मार्गदर्शक तत्त्वे ठरवासिंघवी म्हणाले की, मोदींनीजी भाषा व शब्द वापरले तेच शब्द इतरांनी वापरले, तर आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदी लागू केली, पण मोदींना ‘क्लीन चिट’ दिली. याबाबत कोर्टाने काही मार्गदर्शक तत्वे ठरवून द्यावीत, ज्याचा भविष्यात उपयोग होईल. आयोगाच्या निर्णयाच्या प्रती रेकॉर्डवर सादर करण्यासाठी खंडपीठाने सिंघवी यांना वेळ दिला. पुढील सुनावणी बुधवारी होईल.
मोदींच्या ‘क्लीन चिट’वर बुधवारी होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:45 AM