सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या एका न्यायालयाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधातील मानहानी खटल्याची सुनावणी ५ सप्टेंबरला केली आहे. या खटल्यातील फिर्यादीची प्रकृती चांगली नसल्याने तो सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही. सुलतानपूर येथील न्यायालयाने शुक्रवारी संबंधित प्रकरणीची सुनावणी लांबणीवर टाकली.
फिर्यादीने प्रतिज्ञापत्राद्वारे प्रकृती चांगली नसल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहु शकत नसल्याचे सांगितल्याचे भाजप नेते विजय मिश्रा यांच्या वकिलाने सांगितले. २०१८मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये सूलतानपूर जिल्ह्यात भाजप नेते व माजी सहकार अध्यक्ष विजय मिश्रा यांनी त्यांच्याविरोधात मानहानी प्रकरणी खटला दाखल केला होता. भारत जोड़ो न्याय यात्रेदरम्यान २० फेब्रुवारी २०२४ रोजी गांधींनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.