गाळेधारकांच्या नोटिसीवर सुनावणी मनपा: चार अधिकार्यांची नियुक्ती
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
जळगाव : भाडे कराराच्या रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने गाळेधारकांना बजावलेल्या कलम ८१ च्या नोटिसीवर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी ठेवली असून यासाठी चार अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत.
जळगाव : भाडे कराराच्या रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने गाळेधारकांना बजावलेल्या कलम ८१ च्या नोटिसीवर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी ठेवली असून यासाठी चार अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या १४ गाळ्यांमधील भाडे वसुलीची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. जवळपास २०० कोटींची भाडे थकबाकी वसुलीचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. १० मार्केटबाबत सुनावणीमुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ८१ प्रमाणे महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलांमधील गाळ्यांची ३१ मार्च २०१२ रोजी मुदत संपलेली आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित गाळे धारकांना ८१ क च्या नोटीसी बजावण्यास सुरुवात केली आहे. काहींना या नोटिसा मिळाल्या तर काहींना देणे बाकी आहे. दिलेल्या या नोटिसींवर गाळे धारकांचे म्हणणे काय? हे आता जाणून घेतले जाणार आहे. नियुक्त अधिकारी व जबाबदारी पुढील प्रमाणे- उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याकडे जुने बी.जे. मार्केट मधील २७२ गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीवर सुनावणी होईल. -मुख्य लेखापरीक्षक एस.बी. भोर यांच्याकडे जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केट, रेल्वे स्टेशन मार्केट, आंबेडकर मार्केट मधील २१० गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीवर सुनावणी होईल. -नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे भास्कर मार्केटमधील २८१ गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीवर सुनावणी होईल. - शहर अभियंता दिलीप थोरात यांच्याकडे छत्रपती शाहूमहाराज मार्केट, भोईटे मार्केट, रामलाल चौबे मार्केट, शिवाजीनगर दवाखान्यानजीकची दुकाने अशा २४१ गाळ्यांबाबत सुनावणी होणार आहे.---अधिकारी कळविणार तारखा या अधिकार्यांनी आता आपल्याकडे असलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना सुनावणीची तारीख कळवायची आहे. त्यानंतर व्यापारी संकुलनिहाय नोटिसा बजावून सुनावणीचे कामकाज महापालिकेत होईल.