नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट २५ जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी दिलेल्या आदेशात सुधारणा करावी, अशी याचिका राजस्थान आणि मध्य प्रदेशने सोमवारी केली. या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी सुनावणी घेणार आहे.कोणत्याही वादग्रस्त चित्रपटाचे प्रदर्शन कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होण्याची शक्यता दिसल्यास रोखण्याचे अधिकार सिनेमाटोग्राफ कायद्याचे कलम सहानुसार आहेत, असा दावा या दोन्ही राज्यांनी याचिकेत केला आहे. चित्रपटाचे निर्माते व्हायकोम १८च्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे न्यायालयात बाजू मांडणार आहेत.रस्ते अडवलेउज्जैन : ‘पद्मावत’च्या निषेधार्थ करनी सेनेच्या सदस्यांनी सोमवारी काही रस्ते अडवून ठेवले होते.राजपूत समाजाच्या करनी सेनेने उज्जैन ते नागदा, देवास ते माकसीआणि अगार ते कोटा हे रस्ते टायर जाळून रोखून धरले. पोलीस अधीक्षक सचिन अतुलकर म्हणाले की, निदर्शकांकडून निवेदन स्वीकारून आम्ही रस्ते मोकळे केले.लोकक्षोभ उफाळेल : कालवीजयपूर : ‘पद्मावत’ चित्रपटाला कोणतीही किंमत मोजू, परंतु प्रदर्शित होऊ देणार नाही. कुठल्याही चित्रपटगृहाने तसा प्रयत्न केला, तर त्याला प्रचंड लोकक्षोभाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा श्री राजपूत करनी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी यांनी सोमवारी दिला. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी जयपूरमध्ये केली.
‘पद्मावत’वर आज सुनावणी, दोन राज्यांच्या याचिका; आदेशात बदल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:40 AM